काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विश्रांतीसाठी मसुरीला गेला होता. जवळजवळ आठवडाभराची सुटी संपवून आता तो मुंबईत परतलाय. सुटीचा आनंद घेण्यासाठी मसुरी हे सचिनचे आवडते स्थळ आहे. त्यामुळेच त्याने यावेळीही सुटीसाठी मसुरीलाच जाण्याचा निर्णय घेतला होता.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन आता क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, निवृत्तीनंतर काय करणार, ते सचिनने अद्याप जाहीर केलेले नाही. उदयोन्मुख खेळाडूंना स्वतःच्या अनुभवांचा फायदा करून देत क्रिकेटशी जोडलेली नाळ तशीच ठेवण्याचा मानस सचिनने क्रिकेटमधील निवृत्तीनंतर व्यक्त केला होता. सचिन पुढे काय करतोय, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे

Story img Loader