ICC Cricket World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला गुरुवारपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तसेच या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात १४ ऑक्टोबरला होणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला महत्त्वाचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विश्वचषकापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी संघाला सल्ला दिला आहे. भारताचा बाद फेरीत पाकिस्तानशी सामना झाला, तर दुसरी संधी नाही, असे सचिन म्हणाला. या सामन्यामुळे संघावर खूप दबाव निर्माण होतो. या दडपणाखालील स्पर्धेत चांगली कामगिरी करणे प्रत्येकासाठी सोपे नाही.

खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध दबावात येतात –

आयसीसी विश्वचषकापूर्वी सचिन तेंडुलकरने स्टार स्पोर्ट्सला मुलाखत दिली आहे. यादरम्यान सचिन तेंडुलकर सामन्यातील दबावाबद्दल बोलत होता. सचिन म्हणाला की, बाद फेरीच्या सामन्यात कोणत्याही संघाला दुसरी संधी मिळत नाही. सामन्यात चांगली कामगिरी करण्याची संधी गमावली, तर ही संधी पुन्हा मिळणार नाही. सचिन पुढे म्हणाला की, सामना पाकिस्तानविरुद्ध असेल, तर संघ अधिक दडपणाखाली असतो.

हेही वाचा – Asian Games: भारताने २०व्या सुवर्णपदकावर कोरले नाव! दीपिका-हरिंदर या जोडीने मिश्र दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत नोंदवली सुवर्ण कामगिरी

सामने कुठे-कुठे खेळले जातील?

एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमसह १० मैदानांवर खेळवले जातील. यामध्ये हैदराबादचे राजीव गांधी स्टेडियम, धरमशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम, चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, लखनऊचे भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, पुण्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, बंगळुरुचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि कोलकाताचे ईडन गार्डन यांचा समावेश आहे.

हेही वाचा – ‘World Cup 2023’ला आजपासून सुरुवात, Google ने बनवले खास डूडल… एकदा बघाच

भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे, जो ८ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल. यानंतर अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar said that if knockout match is against pakistan team is under more pressure in world cup vbm
Show comments