देशभरात आज फ्रेंडशीप डे साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राचं स्थान हे मोठं असतं. आपल्या सुख-दुःखाच्या काळात मित्र हे नेहमी आपल्यासाठी धावून येतात. लहानपणी मित्रांसोबत खेळताना, त्यांच्यासोबत मजा-मस्ती करतानाच्या अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात असतात. आजच्या दिवशी प्रत्येक जण सोशल मीडियावर आपल्या मित्रांना फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा देतो आहे. अनेक सेलिब्रेटी आणि खेळाडूही यात सहभागी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही या निमित्ताने आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमला आहे. साहित्य सहवास या आपल्या जुन्या घरातील लहानपणीच्या मित्रांसोबत खेळतानाचा एक फोटो सचिनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

मैत्री ही क्रिकेटच्या मैदानातल्या Flood Light सारखी असते. कोपऱ्यात राहून ते तुमचं यश एन्जॉय करतात. पण ज्यावेळी तुमच्यावर कोणतं संकट येणार असेल तर तेच पहिल्यांदा तुमच्यासाठी धावून येतात, अशा आशयाचा संदेश लिहित सचिनने सर्वांना फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.