क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी म्हणजेत १४ ऑगस्ट १९९० साली सचिननं पहिलं कसोटी शतक झळकावलं होतं. ते सचिनचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक होतं. त्यानंतर सचिनने मागे वळून पाहिलं नाही. सचिननं इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत ही कामगिरी केली होती. सचिनने मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डमध्ये ११९ धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे सामना ड्रा करण्यास मदत झाली होती. या खेळीचा व्हिडिओ सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ग्राहम गूच (११६), मायकल आर्थटन (१३१) आणि रॉबिन स्मिथने (१२१) धावा करत इंग्लंडला पहिल्या डावात ५१९ ही धावसंख्या उभारून दिली होती. भारताची पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली. रवि शास्त्री आणि नवजोत सिंह सिद्धू स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन १७९ आणि संजय मांजरेकरनं ९३ धावांची खेळी केली. तर सचिनने पहिल्या डावात ६८ धावा केल्या. त्यामुळे भारताला ४३२ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसरा डाव ३२० धावांवर घोषित केला आणि भारतासमोर ४०८ धावांचं लक्ष्य ठेवलं.

इंग्लंडने ठेवलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज झटपट बाद झाले. १८३ या धावसंख्येवर ६ गडी बाद झाले होते. मात्र सचिनने ११९ धावा आणि मनोज प्रभाकरने ६७ धावा करत सामना ड्रॉ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Tokyo Olympic: नीरज चोप्राच्या सुवर्ण पदकाचा जर्मनीतील गावात जल्लोष!; कारण…

सचिनने शतकांच्या शतकांची सुरुवात येथून केली होती. कसोटीत सचिनने ५१, एकदिवसीय सामन्यात ४९ शतकं केली आहेत. कसोटीत नाबाद २४८ धावा ही सर्वोत्कृष्ट खेळी आहे. तर एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा पहिला खेळाडू आहे. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरोधात २०१० मध्ये ग्वालियरमध्ये नाबाद २०० धावांची खेळी केली होती.