Sachin Tendulkar shared a picture of him having lunch with Yuvraj Singh and Ajit Agarkar: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या पत्नी अंजलीसोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. त्याने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये तो काही माजी सहकाऱ्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे. हे माजी खेळाडू एक हॉटेलमध्ये जेवणायासाठी एक आल्याचे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्राम फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “दोन गोष्टी ज्या आपल्याला जवळ ठेवतात, त्या म्हणजे मैत्री आणि जेवण. गट एक आश्चर्यकारक दुपारच्या जेवणासाठी भेटले. शेअर केलेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि माजी अष्टपैलू युवराज सिंग त्यांच्या पत्नींसोबत जेवणाच्या टेबलावर बसलेले दिसत आहेत. संघाचे तीन माजी सहकारी जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्यात अनेक जुन्या आठवणींवरुन बऱ्याच चर्चा होत असतात.

तिघांनाही गोल्फ खेळायला आवडते –

या तिन्ही खेळाडूंनी मिळून अनेक वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आजही त्यांच्यात चांगलं बॉन्डिंग आहे. तिघांनाही अनेकदा एकत्र गोल्फ खेळताना पाहिले गेले आहे. कारण तिघांनाही गोल्फ खेळायला आवडते. सचिनच्या या पोस्टवर क्रिकेटर्स आणि चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अनुभवी क्रिकेटपटू ब्रायन लाराच्या कमेंट्सचाही समावेश आहे. लाराने कमेंट करताना लिहिले, ‘हाय मित्रांनो, तुम्ही भाग्यवान आहात, माझ्या गोल्फच्या मित्रांनो आनंद घ्या.’

तत्पुर्वी, ४ जुलै रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अजित आगरकर यांची टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आगरकर प्रथमच मुख्य निवडकर्ता बनला आहे. चेतन शर्मा यांनी मुख्य निवड समितीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी अजित आगरकर यांची निवड करण्यात आली आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीत शिव सुंदर दास, सुब्रोतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरत यांचा समावेश असेल.

हेही वाचा – IND vs WI: विराट कोहली नेट सेशनमध्ये आर आश्विनचा केला सामना, रिव्हर्स स्वीप मारतानाचा VIDEO होतोय व्हायरल

अजित आगरकर हा इंग्लंडमधल्या ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या १० दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अजित आगरकरच्याच नावावर आहे. अजितचा हा विक्रम गेल्या २३ वर्षांपासून अबाधित आहे. २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने २१ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar shared a picture of him having lunch with yuvraj singh and ajit agarkar in london vbm
Show comments