Sachin Tendulkar Shares Post on Ramakant Achrekar Sir Statue: भारताला मास्टर ब्लास्टरसारखा महान क्रिकेटपटू देणारे गुरू म्हणजे स्वर्गीय रमाकांत आचरेकर सर. आचरेकरांनी नवोदित क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी आपले आयुष्य व्यतीत केलेल्या मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये हे स्मारक बांधले जाणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथ आचरेकर सरांनी केवळ तेंडुलकरांनाच नव्हे तर प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या इतर अनेक खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षण दिले, जे नंतर भारतीय संघातून खेळले. आता महाराष्ट्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या आचरेकर सरांचे २ जानेवारी २०१९ रोजी मुंबईत निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकर आणि ‘बाकरवडी-चहा’, नवी जाहिरात का करतेय प्रेक्षकांना भावुक?

सचिने तेंडुलकरच्या प्रशिक्षकांचे शिवाजी पार्कमध्ये होणार स्मारक

नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासकीय प्रस्तावानुसार, शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ५ येथे रमाकांत आचरेकर यांचे ६x६x६ आकाराचे स्मारक बांधण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुंबईच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्मारकाच्या बांधकामाची शिफारस केली होती. स्मारकाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (MCGM) आयुक्तांची असेल, असेही जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Ravindra Jadeja Wife: रवींद्र जडेजाची आमदार पत्नी कंबरेभर पाण्यात उतरून करतेय लोकांची मदत, जडेजाच्या कमेंटनेही वेधलं लक्ष, पाहा VIDEO

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला. आचारेकर सरांचा फोटो शेअर करत तेंडुलकर म्हणाला, “आचरेकर सरांचा माझ्या आणि इतर अनेकांच्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हे बोलत आहे. शिवाजी पार्क हा सरांचा बालेकिल्ला होता. त्याच परिसरात त्यांनी असंख्य क्रिकेटपटू घडवले. आपल्या स्मृती याच ठिकाणी चिरंतन राहाव्यात अशीच त्यांची इच्छा असेल. स्मारकाच्या निमित्ताने कर्मभूमीत सरांचा वसा कायमस्वरुपी जपला जाणार आहे. आचरेकर सरांचे स्मारक त्यांच्या कर्मभूमीमध्ये उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे.”

हेही वाचा – Paris 2024 Paralympics: पहिली भारतीय टेबल टेनिस पदक विजेती, पॅरालिम्पिक नेमबाज चॅम्पियन, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा भालाफेकपटू… ‘हे’ आहेत पॅरालिम्पिक स्पर्धेत संभाव्य पदकविजेते

रमाकांत आचरेकर सरांनी शिवाजी पार्कच्या मैदानात असंख्य क्रिकेटपटू घडवले. भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांकडेच क्रिकेटचे धडे गिरवले. ‘मी जो काही आहे जो काही मी घडलो तो फक्त आणि फक्त आचरेकरांमुळेच’ असे सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांच्या निधनानंतरच्या स्मृती सभेत म्हटले होते. आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा देत त्यावेळी त्यांचं कोचिंग किती छान होतं, आपण त्यातून काय काय शिकलो हे देखील सचिनने सांगितलं. मी २४ वर्षे भारतासाठी फलंदाजी करू शकलो त्याचं कारण फक्त आणि फक्त आचरेकर सर होते असंही सचिनने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar shares post on ramakant achrekar sir memorial at shivaji park approval of maharashtra government bdg