Sachin Tendulkar Latest News Update : जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरने २१ एप्रिलला चाहत्यांसोबत प्रश्नोत्तराचं एक सत्र आयोजित केलं होतं. सचिनने पहिल्यांदाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर चाहत्यांना #AskSachin च्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे दिली. सचिनने त्याच्या पदार्पणाबाबत सांगतानाच २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात झालेल्या एका सामन्यात बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना विरोट कोहलीसोबत काय चर्चा केली होती, यावरही भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन तेंडुलकरला एका चाहत्याने ट्वीट करत २०११ च्या विश्वचषकातील फोटोच्या माध्यमातून प्रश्न विचारला की, विराट कोहलीसोबत त्यांनी काय चर्चा केली होती. यावर सचिनने उत्तर देताना म्हटलं की, चेंडू अजूनही थोडा स्विंग होत आहे. त्यानंतर सचिनला एका चाहत्यानं विचारलं, महेंद्र सिंग धोनीला तुम्ही काय म्हणून हाक मारता, यावर सचिनने म्हटलं, मी धोनीला एम एस बोलतो.

नक्की वाचा – Video: शतक ठोकल्यानंतरही सचिन तेंडुलकरला राग का आला? ‘तो’ किस्सा सांगताना सचिन म्हणाला…

या प्रश्नोत्तराच्या सत्रात सचिनला एका चाहत्याने त्यांच्या आवडच्या शॉटबद्दलही प्रश्न विचारला. ज्यामध्ये एक अप्पर कट आणि दुसरा स्ट्रेट ड्राईव्हचा पर्याय दिला होता. यावर उत्तर देताना सचिनने म्हटलं की, त्याला अपर कट खेळायला खूप आवडतं. पर्थच्या मैदानात ब्रेट लीच्या गोलंदाजीवर कसोटी सामन्यात सचिनने पहिल्यांदा हा शॉट खेळला होता.

वानखेडेनंतर ‘हा’ मैदान सचिनचा आवडता स्टेडियम

मुंबईचा वानखेडे स्टेडियम सचिनचा भारतातील आवडता स्टेडियम आहे. अशातच एका चाहत्याने दुसरा आवडता स्टेडियम कोणता? असा प्रश्न सचिनला विचारला. यावर सचिनने उत्तर देताना म्हटलं, वानखेडेनंतर चेन्नईचा चेपॉक स्टेडियम माझा आवडता स्टेडियम आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar started new inning with ask sachin on twitter and gives answers to fans questions virat kohli ms dhoni nss