Sachin Tendulkar Reaction on Sarfaraz Khan Century IND vs NZ Test: देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सर्फराझ खानने आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघातून खेळताना पहिले कसोटी शतक झळकावले आहे. सर्फराझने ११२ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावा करत पहिले शतक केले. शतक पूर्ण केल्यानंतर खास अंदाजात त्याने हे शतक साजरे केले. सर्फराझने रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शतकी कामगिरी करत संघाला संकटातून बाहेर काढले. यावर आता सचिन तेंडुलकरने पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. याबरोबरच मास्टर ब्लास्टरने रचिन रवींद्रचेही कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या सर्फराझने दुसऱ्या डावात शतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडिया न्यूझीलंडवर आघाडी मिळविण्याच्या जवळ आहे. सर्फराझ खानशिवाय पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या रचिन रवींद्रचेही सचिन तेंडुलकरने कौतुक केले.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

सचिन तेंडुलकर सर्फराझ खानच्या पहिल्या शतकावर काय म्हणाला?

सचिन तेंडुलकरने रचिन रवींद्र आणि सर्फराझ खानचा फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली आहे. सर्फराझसाठी सचिन तेंडुलकर म्हणाला, “सर्फराझ खान काय मोक्याच्या क्षणी तू पहिलं कसोटी शतक झळकावलं आहेस आणि अशावेळी जेव्हा संघाला या शतकाची सर्वात जास्त गरज होती.”

रचिन रविंद्रच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात ४०२ धावा करण्यात यशस्वी ठरला आणि पाहुण्या संघाने भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली. सचिन तेंडुलकरने रचिन रवींद्रसाठी लिहिले, “क्रिकेट आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो. रचिन रवींद्रचे बंगळुरूशी एक विशेष नाते आहे, त्याचे कुटुंबही मूळचे बंगळुरूचे आहे. त्याच्या नावावर आणखी एक शतक.”

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये आज होणार हायव्होल्टेज लढत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह?

बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारत अवघ्या ४६ धावांत ऑल आऊट झाला होता. एवढी खराब सुरुवात करूनही टीम इंडियाने या सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. भारताने ३५६ धावांच्या आघाडीत बरोबरी साधली आहे. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला, ज्यात न्यूझीलंडकडे १२ धावांची आघाडी होती. ऋषभ पंतने चौथ्या चेंडूवर षटकार लगावला आणि मग चौकार लगावत भारतीय संघाने ही आघाडी बरोबरीत सोडवली. सर्फराझ खान आणि ऋषभ पंतने १०० अधिक धावांची आघाडी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar statement on sarfaraz khan maiden test century ind vs nz bengaluru test praised rachin ravindra for his hundred bdg
Show comments