मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (एमसीए) अनेक बदल होण्याची शक्यता आहे. एमसीए सदस्यांनी २९ जुलै रोजी विशेष सर्वसाधारण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा मतदानाचा हक्क रद्द करणे, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना पदे भूषवण्याची परवानगी देणे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांऐवजी सचिवांमार्फत सर्वोच्च परिषद कायदा लागू करणे, यासह संविधानातील प्रमुख प्रस्तावित बदलांवर चर्चा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या बदलांबाबत बहुसंख्य सदस्यांचे एकमत झाले तर सचिन तेंडुलकर, सुनील गावसक आणि दिलीप वेंगसरकर यांसारख्या इतर अनेक भारतीय दिग्गजांना यापुढे एमसीएमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार नाही. लोढा समितीच्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अंतर्गत असलेल्या प्रत्येक राज्य क्रिकेट संघटनेला आपली घटना (संविधान) बदलावी लागली आहे.

हेही वाचा – “माझा मानसिक छळ होतोय,” ऑलिंपिक पदक विजेत्या लोव्हलिना बोरगोहेनच्या आरोपांनी क्रीडा विश्वात खळबळ

एमसीएने प्रस्तावित बदलांबद्दल आपल्या सर्व सदस्यांना नोटीस पाठवल्या आहेत. पाठवलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, ‘एमसीएला आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोणत्याही मतदानाच्या अधिकाराशिवाय सहयोगी सदस्य बनवायचे आहे.’

हेही वाचा – वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारताने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम!

एमसीएच्या ठरावामध्ये असे म्हटले आहे की, ‘कोणत्याही वैयक्तिक सदस्यास जसे की संरक्षक सदस्य, देणगीदार सदस्य इत्यादींना मतदान करण्याचा अधिकार नाही. तसेच लोढा समितीने केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना संघटनेचे सदस्यत्व द्यावे, अशी शिफारस केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहयोगी सदस्य म्हणून संघटनेमध्ये राहू शकतात. ते बैठकीला उपस्थित राहून त्यांच्या योगदान किंवा सूचना देऊ शकतील.’