युवा क्रिकेटपटू परवेझ रसूल आणि उन्मुक्त चंद यांच्यासह निवडण्यात आलेल्या अदिदास युवा संघाला क्रिकेटसूर्य मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकची शिकवणी लाभणार आहे.
क्रिडा साहित्य निर्मिती क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या अदिदास कंपनीने पुढाकार घेत अदिदासमध्ये यावर्षी युवा खेळाडूंचा समावेश केला.
याआधी विराट कोहली, रोहीत शर्मा आणि सुरेश रैनाही अदिदास मध्ये सामिल होते. त्यात आता उन्मुक्त चंद, परवेझ रसूल, विजय झोल, मनन वोरा, मनप्रीत जुनैजा, रूष कलारिया, चिराग खुराना, आकाशदीप नाथ, विकास मिश्रा, सरफराज खान आणि अपराजीत बाबा यांचा आदीदासने समावेश करून घेतला आहे. या सर्व युवा खेळाडूंचे अदिदासचा राजदूत सचिन तेंडुलकरने ‘अदिदास टीम’मध्ये स्वागत केले.
यावेळी सचिन म्हणाला, क्रिकेटचे भविष्य या युवा खेळाडूंच्या हाती असल्याचे जाणून अदिदासने क्रिकेट खेळाच्या प्रति उचलेले महत्वाचे पाऊल आहे. यांच्या शिकवणीच्या निमित्ताने मला पुन्हा क्रिकेटच्या सानिध्यात राहता येईल. या युवा खेळाडूंच्या सानिध्यात क्रिकेटच्या बाबतीत तरुण राहता येईल. असेही सचिन म्हणाला.

Story img Loader