क्रिकेटच्या क्षितिजावर स्वतःच्या बॅटने तळपणाऱया सूर्य़ाने मावळण्याचा ठरवले आहे. क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या २००व्या कसोटी सामन्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होतोय. सचिनने याआधीच एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
क्रिकेट क्षितीज सुने झाले..
वेस्ट इंडिज विरूद्धची कसोटी मालिका सचिनच्या क्रिकेट करिअरमधली शेवटची मालिका ठरणार आहे. सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याशी संपर्क साधून आपल्यावतीने खालील निवेदन प्रसिद्ध करायला सांगितले.
सर्व स्वप्नं साकार झाली
‘‘माझे संपूर्ण आयुष्य मी भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न जोपासले. हे स्वप्न मी गेली २४ वर्षे प्रत्येक दिवस जगत आहे. मी ११ वर्षांचा होतो तेव्हापासून माझ्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. त्यामुळे क्रिकेट न खेळता जीवन जगणे याचा विचार करणेही मला कठीण जात आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि जगभरात खेळणे, हा मी माझा मोठा सन्मान समजतो. मी माझ्या कारकीर्दीतील २००वा कसोटी सामना मायदेशात खेळून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचे ठरवले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या माझ्यावरील सर्वतोपरी प्रेमाबद्दल आणि मला अंत:करणापासून जोवर खेळावेसे वाटेल तोपर्यंत खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल बीसीसीआयचा मी अत्यंत ऋणी आहे. माझ्या कुटुंबीयांचा त्यांच्या संयम आणि समजूतदारपणाबद्दल आभारी आहे. या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मी माझे चाहते आणि हितचिंतक यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छांमुळेच मला मैदानावर जाऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याचे बळ मिळाले.”
सचिनच्या कारकीर्दीतील ५० हजार धावा पूर्ण
मुंबई ‘चॅम्पियन्स’ झाली तेव्हा..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा