सचिन त्याच्या अखेरच्या सामन्याअंती ड्रेसिंग रूमधून बाहेर येतो. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि अन्य सहकारी त्याला उचलून मैदानाची फेरी मारतात. हा क्षण अगदी तसाच होता, जसा फुटबॉलसम्राट पेले न्यूयॉर्कमधील कॉसमॉस क्लबसाठी अखेरचा सामना खेळला होता. गोलरक्षक शेप मेसिंगने पेलेंना उचलून मैदानात नेले. तेव्हा त्या मैदानाला मारलेल्या अखेरच्या भावनिक फेरीनंतर पेले यांनी मेसिंगला कानात सांगितले, ‘‘आणखी एकदा, प्लीज!’’
मुंबईच्या वानखेडे मैदानावर २०१३ मध्ये असाच काहीसा प्रकार घडला. ‘सचिन..सचिन’ अशा आरोळय़ांनी आसमंत निनादून गेला होता. क्रिकेटला शेवटचा नमस्कार करण्याची जबरदस्त इच्छा सचिनमध्ये निर्माण झाली आणि खेळपट्टीपर्यंत जाण्याचा एक जादूई मार्ग तयार झाला.सचिनच्या आयुष्यात जे घडले आणि नंतर जे घडणार होते, ते केवळ या २२ यार्डाच्या खेळपट्टीमुळेच. त्या खेळपट्टीविषयी त्याला आदर व्यक्त करायचा होता. खेळपट्टीचे आभार मानायचे होते आणि म्हणूनच तो खेळपट्टीसमोर नतमस्तक झाला.
‘‘स्टार टीव्हीवरील एक व्यक्ती माझ्याजवळ आली. त्याने मला कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. सामन्याचा मानकरी बोलेल, वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी बोलेल. त्यानंतर मला रवी शास्त्रीच्या तीन प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. शेवटी विजयी कर्णधार धोनी बोलेल आणि विजेत्या भारतीय संघाला करंडक दिला जाईल. इथेच कार्यक्रम संपेल,’’ अशी आठवण सचिन सांगतो.तेव्हा, सचिनने जर आग्रह धरला नसता, तर जगाने ते भावनिक निरोपाचे भाषण पाहिले नसते. ‘‘माझे निरोपाचे भाषण सहाव्या दिवशी म्हणजे कसोटी सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत नियोजित केले होते. माझ्या मनात तेव्हा एक विचार डोकावला. मला बोलायचे असेल, तर हाच एक क्षण आहे. मी त्या व्यक्तीला विचारले, मी थोडा वेळ बोलू शकतो का? बोललात तर खूप आनंद होईल, असे तो म्हणाला. त्याच्या होकारानंतर ‘मला किती वेळ मिळेल. माझे भाषण दोन मिनिटांपेक्षा जास्त चालेल,’ असे मी त्यांना म्हणालो. त्यावर त्यांचे उत्तर आले..दोन तास बोललात तरी चालेल.’’
त्यानंतर मैदानावर फक्त सचिन बोलत होता. बोलायला सुरुवात करताना सचिनने खिशातून एक कागद बाहेर काढला. या सगळय़ाबद्दल तो म्हणाला, ‘‘माझे भाषण उत्स्फूर्त होते. मला कुणाला विसरायचे नव्हते म्हणून मी ज्यांच्याबद्दल जशा क्रमाने बोलायचे तेवढेच त्या कागदावर लिहून आणले होते. यादीतील लोकांबद्दल मी काय बोलणार हे मला माहीत होते. काहीच नियोजित नव्हते. जे काही मनाने सांगितले, स्फुरले ते बोललो,’’ असे सचिन सांगतो.
(‘दि इंडियन एक्स्प्रेस’चे संदीप द्विवेदी आणि श्रीराम वीरा यांनी घेतलेल्या सचिनच्या मुलाखतीमधील संपादित अंश.)