मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात येणारी भेटवस्तू ही आपल्याच पंसतीची असावी, असे स्पष्टीकरण सचिन तेंडुलकरने हरयाणामधील लाहिली येथे रणजी सामना खेळण्यासाठी जाण्यापूर्वी केले आहे.
एमसीएकडून गुरुवारी प्रफुल्ल सावंत यांनी चित्रीत केलेली दहा चित्रे सचिनला निवड करण्यासाठी पाठवण्यात आली होती. वानखेडेवर होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोनशेव्या कसोटीनिशी कसोटी क्रिकेटला अलविदा करीत आहे. निवृत्तीच्या दिवशी सचिनला एमसीएकडून चित्राची भेट देण्यात येणार आहे.
हरयाणाविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्याला मुंबईहून जाण्यापूर्वी सचिनने आपल्या पसंतीबाबत एमसीएकडे मत प्रदर्शित केले आहे.
एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रख्यान चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे नाव सुचवले होते. त्यानंतर काही चित्रांचे नमुने एमसीएला पाठविण्यास सांगण्यात आले होते, मग ते सचिनला दाखवण्यात आले होते. सावंत यांच्या चित्रांपैकी सचिनने निवड केली असती तर त्याची किंमत अंदाजे ३ ते ५ लाख रुपये झाली असती.
‘‘सचिनला हव्या असलेल्या अन्य चित्रांची आम्ही व्यवस्था आता करणार आहेात. सचिने स्वत:हून फक्त एवढेच आम्हाला सांगत आहे,’’ अशी माहिती एमसीएच्या सूत्रांनी दिली.
बॅट, सुवर्ण किंवा रौप्य सन्मानचिन्हापेक्षा मला एखादे चित्र भेट म्हणून द्यावे, असे सचिनने एमसीएला आधीच स्पष्ट केले होते. ‘‘मी माझी चित्रे एमसीएला पाठवली आहेत. परंतु अद्याप मला प्रतिसाद देण्यात आलेला नाही,’’ असे सावंत यांनी सांगितले.
सचिनला स्वत:च्याच पसंतीचे चित्र भेट म्हणून हवे!
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात येणारी भेटवस्तू ही आपल्याच पंसतीची असावी, असे स्पष्टीकरण सचिन तेंडुलकरने हरयाणामधील लाहिली येथे रणजी सामना खेळण्यासाठी जाण्यापूर्वी केले आहे.
![सचिनला स्वत:च्याच पसंतीचे चित्र भेट म्हणून हवे!](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/10/spt0281.jpg?w=1024)
First published on: 26-10-2013 at 05:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar want his favorite picture in gift