भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर लहानपणापासून चांगले मित्र आहेत. तसेच त्यांना भारताचे सर्वात स्फोटक सलामीवीर म्हणूनही ओळखले जाते. पण सचिनला पाहून दादा चक्क घाबरला होता. सौरव गांगुलीनी याचा खुलासा केला आहे.
सौरव गांगुलीने एका मुलाखतीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला झोपेत चालायची सवय असल्याचा मोठा खुलासा यावेळी दादाने केला आहे. या मुलाखतीमध्ये दादाने भारतीय संघाबद्दलचे आणि ड्रेसिंग रूममधील अनेक मज्जेदार किस्से सांगितले.
सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर एका दौऱ्यादरम्यान रुममेट होते. मध्यरात्री गांगुलीला जाग आली तेव्हा सचिन संपूर्ण खोलीभर फिरत होता. सलग दोन रात्री हा प्रकार बघितल्याने मी प्रचंड घाबरलो होतो असा खुलासा गांगुलीने केलाय. सकाळी सौरव गांगुलीने सचिनला या प्रकाराबाबत विचारलं असता त्याने आपल्याला झोपेत चालायची सवय असल्याचं सांगितलं असं गांगुलीने या मुलाखतीत म्हटले आहे.
या शोमध्ये अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. विराट कोहली, नेहरा, रोहित, कार्तिक, युवराज, सचिनसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी ड्रेसिंग रुममधील किस्से सांगितले आहे.