Sachin Tendulkar was given a golden ticket for the ICC World Cup 2023: ५ ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप २०२ चे आयोजन होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष पुढाकार घेतला आहे. बोर्डाने भारतातील आयकॉन्सना खास तिकिटे देण्याची योजना आखली आहे. त्याला ‘गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स’ असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन यांना पहिले गोल्डन तिकीट देण्यात आले. त्यानंतर आता क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हे तिकीट देण्यात आले आहे.

वास्तविक बीसीसीआयने एक्स (ट्विटर) अॅपवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सचिनसोबत जय शाह दिसत आहे. जय शहा यांनी सचिनला गोल्डन तिकीट दिले आहे. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, “देश आणि क्रिकेटसाठी खास क्षण. गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स कार्यक्रमांतर्गत, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर यांना सुवर्ण तिकीट प्रदान केले.”

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

बीसीसीआयने यापूर्वी अमिताभ बच्चन यांनाही गोल्डन तिकीट दिले होते. २०२३ मध्ये विश्वचषक भारतात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा – US Open 2023: रोहन बोपण्णाचा विश्वविक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू, विजेतेपदापासून एक पाऊल दूर

भारतातील १० शहरांमध्ये ही स्पर्धा रंगणार –

विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये ५ ऑक्टोबरला तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता फेरीतून या स्पर्धेत पोहोचले आहेत.

विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला जाणार –

या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांबरोबर राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला करून वर्ल्डकप २०१९च्या ट्रॉफीवर नाव कोरले होते.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी खुशखबर, ‘या’ धडाकेबाज खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन

एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

Story img Loader