भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यष्टीरक्षक-फलंदाज अशा दुहेरी भुमिकेसाठी धोनीची संघात निवड करण्यात आली होती. पहिल्या दोन सामन्यात धोनीची कामगिरी अत्यंत खराब होती, पण तिसऱ्या सामन्यात धोनीने यष्ट्यांच्या मागे आपली जबाबदारी चोख पार पाडत पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यात धोनीने २ फलंदाजांना यष्टीचीत केले. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात त्याने ही किमया साधली.
CoronaVirus : लॉकडाउनमुळे क्रिकेटपटूंची लग्न पडली लांबणीवर
२७ डिसेंबर २००४ साली धोनी आपला तिसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मैदानावर उतरला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३४८ धावांचा डोंगर उभा केला. त्यात धोनीने २ चेंडूत एका षटकारासह नाबाद ७ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशच्या संघाच्या फलंदाजीची सुरूवात चांगली झाली नाही. पण तरीदेखील त्यांचा सलामीवीर राजिन सालेह चांगली झुंज देत होता. त्यालाच धोनीने कारकिर्दीतील पहिला यष्टीचीत बाद केला.
Photo : दोन वेळा लग्न करणारे लोकप्रिय क्रिकेटपटू
राजिन सालेह फटकेबाजी करत ८२ धावांवर फलंदाजी करत होता. त्यामुळे कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. सचिननेदेखील गांगुलीचा विश्वास सार्थ ठरवला. सचिनने गोलंदाजी करताना सालेह फटका मारण्यासाठी पुढे आला, त्यावेळी चेंडू धोनीच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला आणि धोनीने लगेच यष्ट्या उडवून सालेहला माघारी धाडले.
#Dhoni first stumping pic.twitter.com/5v1CShPtgo
— Viraj B. (@VirajB1) April 6, 2020
World Cup Final : धोनी चित्रपटात न दाखवलेल्या प्रसंगाबाबत सचिन-सेहवागचा मोठा खुलासा
धोनीने त्यानंतर कारकिर्दीत १०० हून अधिक स्टंपिंग केले, पण पहिला स्टंपिंग मात्र त्याने सचिनच्या गोलंदाजीवरच केला.