Sachin Tendulkar Memories Before 50th Birthday : भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तान दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. ५० व्या जन्मदिनानिमित्त सचिनने जुने किस्से सांगितले आहेत. खेळाडू आणि माध्यमकर्मी एकाच खोलीत बसायचे, एकत्र जेवण करायचे, याबाबत सचिनने माहिती दिलीय. तसच पहिलं शतक आणि वडीलांबाबतही सचिनने भाष्य केलं आहे.
एका कार्यक्रमादरम्यान सचिनने स्टेजवरून बोलताना खुलासा करत म्हटलं की, “वृत्तपत्रात फोटो न छापल्याने मी खूप नाराज झालो होतो. मास्टर ब्लास्टर सचिनने बालपणातील दिवस आठवत म्हटलं की, जेव्हा स्कूल क्रिकेटमध्ये पहिलं शतक ठोकलं होतं, त्यावेळी कुटुंबाकडून मोठी प्रतिक्रिया देण्यात आली होती. वृत्तपत्रात मी केलेल्या शतकी खेळीची बातमी फोटोशिवाय छापण्यात आली होती. माझा फोटो छापला नाही, म्हणून मी नाराज झालो होतो. कुटुंबियांनी सांगितलं की, नाराज होण्याची आवश्यकता नाही. पुढच्या वेळी नक्की येईल. पण माझ्या मनात हेच विचार येत होते की, फोटो का नाही छापला गेला? माझ्या वडीलांची थोडीफार ओळख होती. कुणीतरी अभिनंदन करत त्यांना म्हटलं की, तुमच्या मुलाने शतकी खेळी केल्याबद्दल तुमचं अभिनंदन..तुम्ही सर्व खूप आनंदी असाल.
इथे पाहा व्हिडीओ
तेव्हा माझ्या वडिलांनी उत्तर देत म्हटलं, आम्ही तर आनंदी आहोत. पण तो समाधानी नाहीय. कारण वृत्तपत्रात त्याचा फोटो छापला नाहीय. त्यामुळे तो नाराज झाला आहे. याबाबत बोलताना त्या व्यक्तीनं माझ्या वडिलांना म्हटलं, तुम्ही अजित (मोठ्या भावाकडे) फोटो पाठवून द्या. मी काहीतरी करतो आणि त्यानंतर काही दिवसांनी वृत्तपत्रात माझा फोटोसोबत एक मोठं आर्टिकल लिहिण्यात आलं होतं.सचिनने पुढं म्हटलं की, प्रशंसा नेहमीच तुम्हाला चांगली कामगिरी करण्यास मदत करते. जर कौतुक झालं नाही, तर कोणत्याही एथलिटला जगासमोर व्यक्त होण्यास अनुकूल वातावरण मिळणार नाही.”