मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची मालिका त्याने अजूनही सुरू ठेवली आहे. सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र फिक्शन आणि नॉन-फिक्शन वर्गवारीतील सर्वाधिक विक्रीचे पुस्तक ठरले आहे. ‘हॅचे इंडिया’ने ६ नोव्हेंबर २०१४ साली सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले होते. त्याच्या आजवर १,५०,२८९ प्रत विकल्या गेल्या आहेत. या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. ‘प्लेइंग इट माय वे हे’ सचिनचे आत्मचरित्र प्री-बुकिंग नोंदणी, प्रकाशनाच्या पहिल्या दिवशीची विक्री आणि एकूण विक्री अशा तिनही वर्गवारीत सर्वाधिक खप झालेले पुस्तक ठरले आहे. याशिवाय, डॅन ब्राऊन यांच्या ‘इनफर्नो’, वॉल्टर आयसेक्सन यांचे ‘स्टीव्ह जॉब्स’ आणि जे.के.रौलिंग्स याचे ‘कॅज्युअल व्हॅकेन्सी’ या पुस्तकांनीही सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ने मागे टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkars autobiography enters limca book of records