भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे लहानपणीचे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्याचं समोर येतंय. मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना जेवताना त्रास होत असल्यामुळे, अन्न पातळ करुन भरवलं जात होतं. मात्र आज, संध्याकाळच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केलं. आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत.
The BCCI expresses its deepest sympathy on the passing of Dronacharya award-winning guru Shri Ramakant Achrekar. Not only did he produce great cricketers, but also trained them to be fine human beings. His contribution to Indian Cricket has been immense. pic.twitter.com/mK0nQODo6b
— BCCI (@BCCI) January 2, 2019
बीसीसीआयनेही यानंतर ट्विट करुन रमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी आपली क्रिकेट अकादमी सुरु करायच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी आचरेकर सरांची भेट घेतली होती. त्यांची ती भेट अखेरची ठरली. आचरेकर सरांच्या निधनावर क्रीडा जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.