Sachin Tendulkar’s Reply to Akhtar about IND vs PAK Match: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १२व्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध दारुण पराभव पत्करला आहे. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघाची खूप खिल्ली उडवली जात आहे. जिथे भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण आणि माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद लुटला. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शोएब अख्तरच्या एका पोस्टला उत्तर देत पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, शोएब अख्तरने १३ ऑक्टोबर रोजी एक्सवर (ट्वीटर) एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने सचिन तेंडुलकरला बाद करतानाचा जुना फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, उद्या तुम्हाला असे काही करायचे असेल तर शांत राहा. आता त्याच पोस्टला उत्तर देताना सचिन तेंडुलकरने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सचिनच्या उत्तराचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं

सचिनने काय दिले प्रत्युत्तर?

सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, ‘माझ्या मित्रा तुझ्या सल्ल्याचे पालन केले आणि सर्वकाही पूर्णपणे थंड ठेवले.’ सचिनच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पहिल्या डावात पाकिस्तानने ६ विकेट्स गमावल्यानंतर शोएब अख्तरने यापूर्वी निराशा व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या फलंदाजावर प्रतिक्रिया देताना त्याने आपली निराशा व्यक्त केली.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय –

सामन्याबद्दल बोलायचे, तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. भारताचा हा आठवा विजय आहे. कर्णधार रोहित शर्माने ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने सात षटकात १९ धावा देत दोन बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Story img Loader