ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात तडफदार ‘कमबॅक’ करत युवराजने नाबाद ७७ धावांची साकारली खरी पण जरी याचा आनंद त्याला असला तरी, सचिनच्या निवृत्तीची खंत जास्त असल्याचे युवराजने म्हटले आहे. तसेच भारताच्या या क्रिकेटवीराची निवृत्ती म्हणजे फक्त मीच नाही संपुर्ण देश भावूक झाला असेल असेही युवराज म्हणाला.
सचिनच्या निवृत्तीच्या निर्णयाची बातमी समजताच युवराजने आपली ‘कमबॅक’ खेळी सचिनला समर्पित केली. युवराज म्हणाला, “मलाच समजत नाही आहे की, मी आनंदी आहे की दु:खी. चांगले कमबॅक करु शकलो त्यामुळे आनंदी आणि सचिनची निवृत्ती यावर मन दुखी आहे. परंतु, अशीच खेळी मला पुढील सामन्यांतही साकाराची आहे. त्यादृष्टीनेच माझे प्रयत्न असतील”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkars retirement an emotional time for india yuvraj singh