Sachin Tendulkar 14 Feet Statue: क्रिकेटचे दिग्गज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या सन्मानात आणखी एका रत्नाची भर पडणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) वानखेडे स्टेडियमवर तेंडुलकरचा पुतळा बसवणार आहे. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी त्याचे अनावरण केले जाऊ शकते असे बोलले जात होते, परंतु तेव्हा तसे झाले नाही. आता त्याचे अनावरण १ नोव्हेंबरला होणार आहे.

अहमदनगरचे शिल्पकार बनवत आहेत पुतळा –

अहमदनगरचे चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे हे सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काम करत आहेत. प्रमोद कांबळे म्हणाले, ‘वानखेडे स्टेडियममध्ये पुतळा बसवणार असल्याचे एमसीएने सांगितले होते. त्याची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यावर काम करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर मी सचिन तेंडुलकरशी संपर्क साधून त्याची भेट घेतली.’

षटकार मारतानाच्या पोझमधील पुतळा –

कांबळे पुढे म्हणाले, ‘यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. मी त्याला विचारले की पुतळा कसा बनवायचा. यानंतर आम्ही पोझ फायनल केली, ज्यामध्ये तो षटकार मारताना दिसत आहे. आम्ही प्रथम एक लहान मॉडेल बनवले. त्यानंतर आता १४ फूट उंच पुतळा बनवला आहे. जगाचा नकाशा आणि क्रिकेट बॉलच्या ग्राफिक संयोजनाने, आम्ही एक ग्लोब तयार केला आहे आणि त्याच्या वर सचिन तेंडुलकरचे प्रतीकात्मक चित्रण केले आहे. आम्ही एक पॅनेल देखील सेट करत आहोत, जे त्याच्या कारकिर्दीबद्दल असेल.’

हेही वाचा – IND vs NZ, World Cup 2023: रवींद्र जडेजाच्या हातून झेल सुटताच चाहत्यासंह पत्नी रिवाबाही झाली आश्चर्यचकित, VIDEO होतोय व्हायरल

सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. एकदिवसीय आणि कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो जगातील नंबर -१ फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८४२६ धावा आणि कसोटीत १५९२१ धावा आहेत. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके झळकावली होती. आता त्याच्या मागे भारतीय फलंदाज विराट कोहली आहे, ज्याच्या नावावर ७८ शतके आहेत.

Story img Loader