सचिन तेंडुलकर हा २००२-०३मध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यास अनुत्सुक असे. मात्र कालांतराने त्याने याच क्रमांकावर खेळणे पसंत केले, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुस्तकात लिहिले आहे.
गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००२-०३मध्ये एकदिवसीय सामने खेळले होते. त्या वेळी सचिनने सलामीऐवजी चौथ्या क्रमांकावर खेळावे, असे गांगुलीने सुचविले होते. त्या वेळी सचिन नाखूश असे. थोडय़ा दिवसांकरिताच ही जबाबदारी स्वीकारण्यास सचिन तयार झाला. मात्र या क्रमांकावर खेळताना तो स्थिरावला व आपण भरपूर धावा काढू शकत आहोत, असे लक्षात आल्यावर सचिनला खूप आनंद झाला. २००३च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी मात्र पुन्हा सचिनला सलामीची जबाबदारी देण्यात आली, असेही गांगुलीने म्हटले आहे.

Story img Loader