क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असली, तरीही चॅम्पियन्स लीग टी-२०मध्ये मुंबई इंडियन्सकडून सचिन खेळण्याची शक्यता आहे. येत्या २१ सप्टेंबरपासून भारतामध्ये सुरू होणाऱया चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी करण्यात आलेल्या संघांची अंतिम यादी आज शुक्रवार जाहीर करण्यात आली. त्यात मुंबई इंडियन्स संघात सचिनचेही नाव आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघात राहुल द्रविडचेही नाव आहे.
आयपीएलच्या सहाव्या पर्वानंतर सचिनने निवृत्तीची घोषणा केली होती, तर चॅम्पियन्स लीगनंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा राहुल द्रविडने यापूर्वीच केला आहे.
महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याला मात्र चॅम्पियन्स लीगसाठी मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळालेले नाही.
चॅम्पियन्स लीगमध्ये सचिन मुंबई इंडियन्सकडून खेळणार?
क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असली, तरीही चॅम्पियन्स लीग टी-२०मध्ये मुंबई इंडियन्सकडून सचिन खेळण्याची शक्यता
First published on: 30-08-2013 at 04:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin will play clt20