करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत भारताने पाकिस्तानसाठी व्हेंटिलेटर तयार करावेत, तसेच करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशा मागण्या माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केल्या होत्या. त्यामुळे त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तशातच आता शोएब अख्तरने एक नवा प्रताप केल्याने तो पुन्हा टीकेचा धनी झाला आहे.
वाईट बातमी! दिग्गज क्रिकेटपटूचे मुंबईतील राहत्या घरी निधन
नुकताच इन्स्टाग्रामवर शोएब अख्तरने एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमुळे नेटिझन्सनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला. अख्तरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादच्या रस्त्यावर सायकलिंगचा आनंद घेताना दिसला. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या करोनाचा फैलाव होत असल्याने सगळ्यांनी घरी राहावे आणि इतरांनाही घरी राहण्याचा सल्ला द्यावा, असे सांगितले जात आहे. अशा वेळी अख्तर मात्र रस्त्यांवर भटकत असल्याचे दिसत आहे. याशिवाय सायकर चालवताना अख्तरने मास्कदेखील घातलेले नाही.
Covid-19 Lockdown : धोनी, अश्विन मुलांना देतायत फेसबुकच्या सहाय्यानं क्रिकेटचे धडे
View this post on Instagram
Cycling in my beautiful city. Lovely weather. Empty roads. Best work out. #islamabad #pakistan
Coronavirus : लॉकडाउन काळात रोहित शर्माचं काय चाललंय बघा…
संपूर्ण जगात सध्या करोनामुळे भयावह स्थिती असून सारे आपल्या घरात आहेत. अशा वेळी असा प्रताप केल्यामुळे नेटिझन्सने अख्तरला चांगलेच ट्रोल केले आहे.
Coronavirus : क्रीडाविश्वात हळहळ! वडिलांपाठोपाठ दिग्गज क्रीडापटूचेही उपचारादम्यान निधन
या आधी अख्तरने करोनाशी लढण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळवण्याचा सल्ला दिला होता. त्या सामन्यांतून मिळालेला निधी करोनाग्रस्तांना द्यावा असा प्रस्तावही ठेवला होता. तसेच दोन-तीन दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानसाठी १०,००० व्हेंटिलेटर बनवावेत, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती. पण या दोन्ही मुद्द्यावरून तो ट्रोल झाला होता.