जोश्ना चिनप्पाने गेली अनेक वष्रे आंतरराष्ट्रीय क्षितिजावर भारताचा तिरंगा फडकवत ठेवला आहे. नुकतेच तिने आपल्या खात्यावर नववे जेतेपद जमा केले. परंतु भारतातील स्क्वॉशची सध्याची स्थिती पाहून ती व्यथित झाली आहे. देशातील खेळाच्या वाढीला आपल्या योगदानाची कोणतीही मदत मिळत नाही, अशी तिची भावना आहे.
‘‘सध्या तरी मला स्क्वॉशमध्ये निराशाजनक चित्र दिसत आहे. येत्या काही वर्षांत कोणतीही गुणवत्ता प्रकाशात येईल, असे वाटत नाही. अनेक युवा खेळाडू फक्त परदेशांतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी हा खेळ खेळतात,’’ असे जोश्नाने सांगितले.