आशियाई पदक विजेता रंजन सोधी याच्यासह चार नेमबाजांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दोन कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत ‘साइ’चे चिटणीस नीरज कौशल यांनी सांगितले की, ‘‘राष्ट्रकुल स्पध्रेत दोन रौप्यपदके जिंकणारा व आशियाई सुवर्णपदक विजेता सोधी, ऑलिम्पिकपटू शगुन चौधरी, जागतिक सुवर्णपदक विजेती हीना सिद्धू व राष्ट्रकुल तसेच आशियाई पदक विजेता मानवजितसिंग संधू यांना आतापर्यंत प्रत्येकी पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. ग्रॅनाडा येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेपूर्वी त्यांना युरोपात प्रशिक्षण घेण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे. होतकरू खेळाडूंना परदेशातील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची योजना आम्ही अनेक वर्षे अमलात आणली आहे.

Story img Loader