नवीन वर्षांची सुरुवात सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदाने करण्याचे सायनाचे स्वप्न भंगले. कोरियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तासभर चाललेल्या लढतीत चीनच्या लि हानने सायनावर २१-१४, १५-२१, २१-१२ अशी मात केली. बिगरमानांकित हानचा सायनाविरुद्धच्या तीन सामन्यांतला हा पहिलाच विजय ठरला. गेल्यावर्षीही सायनाला या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
दोन्ही खेळाडूंनी आक्रमक सुरुवात केली आणि गुणसंख्या ८-८ अशी बरोबरीत होती. यानंतर हानने शानदार खेळ करत पहिला गेम जिंकला. आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सायनाने आपला खेळ उंचावला. स्मॅशच्या ताकदवान फटक्यांसह नेटजवळून शैलीदार खेळ करत दुसरा गेम सायनाने आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये हानने १२-५ अशी भक्कम आघाडी घेतली. पण त्यानंतर सायनाने जोरदार मुसंडी मारत पुनरागमन केले. यामुळे गुणसंख्या १३-११ अशी झाली. यानंतर हानने सायनाला चुका करण्यास भाग पाडले. रॅलींची संख्या वाढवत हानने पुढील नऊपैकी आठ गुण जिंकत तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2013 रोजी प्रकाशित
कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायनाला पराभवाचा धक्का
नवीन वर्षांची सुरुवात सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदाने करण्याचे सायनाचे स्वप्न भंगले. कोरियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तासभर चाललेल्या लढतीत चीनच्या लि हानने सायनावर २१-१४, १५-२१, २१-१२ अशी मात केली.
First published on: 12-01-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina defeated in korean super series