सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा
गतविजेत्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांना मिश्र दुहेरीच्या सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला तरी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सहज विजय मिळवत सय्यद मोदी खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला.
अव्वल मानांकित प्रणव-सिक्की जोडीला चीनच्या रेन झियानग्यू आणि झोऊ चाओमिन यांच्याकडून ३१ मिनिटांत १४-२१, ११-२१ अशी हार पत्करावी लागली. महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सायनाने मॉरिशसच्या केट फू कुन हिच्यावर २१-१०, २१-१० अशी मात केली. राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी विजेत्या कश्यपने थायलंडच्या टॅनोंगसॅक सेनसूमबुनसूक याचे आव्हान २१-१४, २१-१२ असे परतवून लावले. सायनाला आता भारताच्या अमोलिका सिंग सिसोदिया हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, तर कश्यपची गाठ इंडोनेशियाच्या फिरमान अब्दुल खोलिक याच्याशी पडणार आहे.
बी. साईप्रणिथ यानेही पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना रशियाच्या सर्जी सिरांतला २१-१२, २१-१० असे हरवले. त्याला आता इंडोनेशियाच्या हिरेन रुस्ताविटोचा सामना करावा लागेल. भारताच्या शुभंकर डे याने स्वीडनच्या फेलिक्स बुरेस्टेड याला २१-१५, २१-१३ असे हरवले. पुढील फेरीत त्याची लढत चीनच्या लु गुआंगझू याच्याशी होईल. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या सहाव्या मानांकित जोडीने कृष्णप्रसाद गारगा आणि रुतापर्णा पांडा यांच्यावर २१-१०, २१-१० असा विजय मिळवला.