कोरिया खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत झाल्यानंतर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या मलेशियन सुपर सीरिज स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. चीनच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत सायनाला अव्वल मानांकन देण्यात आले असून सायनाला मात्र आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागणार आहे. पहिल्या दोन लढतीत विजय मिळवल्यास, उपांत्यपूर्व फेरीत सायनासमोर जपानच्या इरिको हिरोस हिचे आव्हान असणार आहे. भारताच्या पी. व्ही. सिंधूला पहिल्याच सामन्यात डेन्मार्कच्या टिने बाऊन हिचे आव्हान पेलावे लागणार आहे. पुरुष एकेरीत, परुपल्ली कश्यपचा सलामीचा सामना जपानच्या ताकुमा उएडा याच्याशी होणार आहे.

Story img Loader