खराब फॉर्म आणि दुखापती यांच्यामुळे २०१३ या वर्षांत एकही जेतेपद पटकावू न शकलेल्या सायनाची जागतिक क्रमवारीत आणखी घसरण झाली आहे. मलेशियात नुकत्याच झालेल्या सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला प्राथमिक फेरीचा अडथळाही पार करता आला नाही. या खराब कामगिरीचा परिणाम होऊन सायनाची सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सायनाला नंतरच्या स्पर्धामध्ये विशेष चमक दाखवता आली नाही. सायनाच्या खात्यात ६०८३० गुण जमा आहेत. ताप आणि संसर्गाच्या कारणांमुळे सायना पुढील वर्षी होणाऱ्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार नाही. यामुळे तिची क्रमवारीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2013 रोजी प्रकाशित
सायनाची क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण
खराब फॉर्म आणि दुखापती यांच्यामुळे २०१३ या वर्षांत एकही जेतेपद पटकावू न शकलेल्या सायनाची जागतिक क्रमवारीत आणखी घसरण झाली आहे.

First published on: 20-12-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal drops two places to world no 8 in badminton rankings