भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालची विजयी घोडदौड मलेशियन खुल्या टेनिस स्पर्धेत कायम असून तिने दिमाखदारपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला.
स्पर्धेतील अव्वल मानांकित सायनाने ओकुहारावर २१-११, १४-२१, २-० असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिला गेम सायनाने २१-११ असा सहज जिंकला खरा, पण दुसऱ्या गेममध्ये तिला १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या गेममध्ये २-० अशी पीछाडीवर असताना ओकुहाराने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि सायनाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सायनाचा सामना ऑल इंग्लंड स्पर्धा विजेती टिने बाऊन आणि सहावी मानांकित झू यिंग ताई यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
पहिल्या गेममध्ये सायनाने ३-० अशी आघाडी घेतली आणि ती कायम ठेवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने आक्रमक खेळ केला आणि गेम जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या गेममध्ये सायनाने २-० अशी आघाडी घेतली तेव्हा ओकुहाराच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तिने सामना सोडण्याचा निर्णय घेतला.
सायना उपांत्य फेरीत दाखल
भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालची विजयी घोडदौड मलेशियन खुल्या टेनिस स्पर्धेत कायम असून तिने दिमाखदारपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला.
First published on: 19-01-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal in semifinal of malaysian super series