घरच्या मैदानावर, प्रेक्षकांच्या उत्साही पाठिंब्यातही इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच सायनाचे आव्हान संपुष्टात आले. तसेच लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या कश्यपचा प्रवास जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली चोंग वेईने संपुष्टात आणला. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानी असलेल्या यिहान वांगने क्रमवारीत आणि मानांकनातही आठव्या स्थानी असलेल्या सायनावर २१-१६, २१-१४ असा विजय मिळवला. सायनाने चांगला खेळ करत यिहानला टक्कर दिली, मात्र झंझावाती आणि सर्वसमावेशक खेळाच्या जोरावर यिहानने बाजी मारली. अव्वल मानांकित ली चोंग वेईने बिगरमानांकित कश्यपवर २१-१५, २१-१३ अशी मात केली.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करत सायना नेहवालने देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. सायनाच्या यशाने भारतीय बॅडमिंटनला नवा हुरूप मिळाला होता. मात्र या धवल यशानंतर खराब फॉर्म आणि दुखापतींचा ससेमिरा यामुळे सायनाच्या कामगिरीत तीव्र घसरण झाली. यंदाच्या वर्षी सय्यद मोदी स्पर्धेचे जेतेपद कमावत सायनाने आश्वासक सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर ती आपल्या दर्जाला साजेशी अपेक्षित उंची गाठू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा