लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने जागतकि क्रमवारीत तृतीय स्थान टिकविले आहे. सायनाने डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. याच स्पर्धेत सायनाने अव्वल मानांकित यिहान वांगवर मात केली होती. फ्रेंच सुपर सीरिज स्पर्धेत मात्र तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने क्रमवारीतील आपले २५वे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. पुरुषांमध्ये पी. कश्यप २३व्या तर अजय जयराम २७व्या स्थानी स्थिर आहे. सौरभ वर्माच्या स्थानामध्ये एकाने घसरण झाली आहे. तो ३३व्या स्थानी आहे.
सायनाने टिकविले जागतिक क्रमवारीतील तिसरे स्थान
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने जागतकि क्रमवारीत तृतीय स्थान टिकविले आहे. सायनाने डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. याच स्पर्धेत सायनाने अव्वल मानांकित यिहान वांगवर मात केली होती. फ्रेंच सुपर सीरिज स्पर्धेत मात्र तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
First published on: 17-11-2012 at 02:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal retains third place in world rankings