‘भारताची फुलराणी’ सायना नेहवाल सध्या खराब फॉर्मच्या चक्रव्यूहात अडकली असून त्याचा परिणाम तिच्या विश्व क्रमवारीवरही झाला आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारी यादीमध्ये सायनाची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सायनाची गेल्या आठवडय़ात क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण झाली होती. कारण तिला डेन्मार्क खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद कायम राखता आले नव्हते. त्यानंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत सायनाला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळेच तिची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दुखापतींनी ग्रासलेली सायनाच्या नावावर सध्या ६२,०१० एवढे गुण आहेत.
भारताची उगवती खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या क्रमवारीत मात्र सुधारणा झाली असून तिने ५२,३५२ गुणांसह अव्वल दहा महिला खेळाडूंमध्ये प्रवेश केला आहे. तर पुरुषांमध्ये पी. कश्यपची क्रमवारीत १२ व्या स्थानी घसरण झाली आहे. पण युवा खेळाडू आरएमव्ही गुरुसाईदत्तची क्रमवारीत सुधारणा झाली असून त्याने अव्वल २० खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.
भारताकडून दुसऱ्या क्रमांकावर गुरुसाईदत्त असून तो १९ व्या स्थानावर आहे, तर अजय जयराम २६ व्या स्थानावर आहे. उगवता तारा समजला जाणारा के. श्रीकांत २७ व्या स्थानावर असून बी. साईप्रणीतने चार स्थानांची कमाई करत ३६ वे स्थान पटकावले आहे, तर आनंद पवारने ३३ व्या स्थानावर
आहे.

Story img Loader