भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती खेळाडू सायना नेहवालला जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्याच लढतीत जपानच्या मिनात्सू मिनातीकडून पराभवाचा धक्का बसला. हा रोमहर्षक सामना मितानीने १९-२१, २४-२२, २१-१९ असा जिंकला.
साखळी गटातील पहिल्या सामन्यात मितानीपेक्षा सायनाची बाजू वरचढ मानली जात होती. दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंग व प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. पहिला गेम सायनाने घेतली. दुसरी गेम शेवटपर्यंत रंगतदार झाला. त्यामध्ये सायनाच्या नकारात्मक खेळाचा फायदा घेत मितानीने हा गेम जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या गेममध्येही विलक्षण चुरस पाहावयास मिळाली. अटीतटीने झालेल्या या गेमसह मितानीने सामनाही जिंकला.
ब गटात असलेल्या सायनाला साखळी फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली झुरुई, सातवी मानांकित येऑन जु बेई यांच्याशी खेळावे लागणार आहे.

Story img Loader