Saina Nehwal struggles with Arthritis : भारताची ऑलिम्पिक कांस्य पदकविजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. भारताच्या या अव्वल बॅडमिंटनपटूला सांधेदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला या वर्षीच्या अखेरपर्यंत तिच्या बॅडमिंटनमधील भविष्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. आजारपणामुळे तिला सराव करणं कठीण झालं आहे. सायना नेहवाल ही बॅडमिंटनमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकलं होतं. तिने आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. मात्र आता सांधेदुखीच्या त्रासामुळे ती निवृत्तीच्या विचारात आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० व २०१८ मध्ये तिने बॅडमिंटनच्या महिला एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. सायनाची बॅडमिंटनमधील कारकीर्द अंतिम टप्प्यात आहे. यावर तिनेही एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय नेमबाज गगन नारंग याचा पॉडकास्ट ‘हाऊस ऑफ ग्लोरी’ या पॉडकास्टमध्ये सायना म्हणाली, “माझ्या गुडघ्याची अवस्था फार चांगली नाहीये. मला संधिवात आहे. त्यामुळे मला आठ ते नऊ तास खेळणं, सराव करणं शक्य होत नाहीये”.

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Success story of Pratiksha Tondwalkar who once worked as a sweeper and now holds the SBI AGM post
शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…
expert career advice tips in marathi
करिअर मंत्र

सायना म्हणाली, संधिवाताचा त्रास असताना तुम्ही जगातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आव्हान कसं देणार? तुम्ही त्यांच्यासमोर कसे टिकणार? मला आज ना उद्या ही गोष्ट स्वीकारावी लागेल. कारण जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरोधात खेळण्यासाठी केवळ एक ते दोन तास सराव करून चालणार नाही. रोज आठ ते नऊ तास द्यावे लागतील, जे सांधेदुखीमुळे शक्य नाही. मी निवृत्ती घेतल्यानंतर काय होईल याचाही मी विचार करतेय. मात्र मला पुढे जे वाढून ठेवलंय ते स्वीकारावं लागेल.

हे ही वाचा >> Suhas Yathiraj : सुहासला सुवर्णपदकाची हुलकावणी! अंतिम सामन्यात रौप्यपदाकावर मानावे लागले समाधान

वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपासून दूर

भारतीय बॅडमिंटनची फुलराणी अशी ओळख असलेली सायना नेहवाल ही भारतीय जनता पार्टीची सदस्य आहे. ती गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपासून दूर आहे. गेल्या वर्षी सिंगापूर ओपनमध्ये ती शेवटची बॅटमिंटन कोर्टवर दिसली होती. त्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सायनाचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

हे ही वाचा >> Paralympics 2024 : महिला बॅडमिंटनपटूंची शानदार कामगिरी, तुलसीमतीने रौप्यपदक तर मनीषाने पटकावले कांस्यपदक

हा निर्णय वेदनादायी असेल : सायना

‘फुलराणी’ म्हणाली, “मी सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. हा निर्णय खूप वेदनादायी असेल, कारण हे एखाद्या नोकरी करणाऱ्या सामान्य व्यक्तीसारखं आहे. मला कल्पना आहे की एका खेळाडूची कारकीर्द लहान असते. त्यामुळे मी काही गोष्टींची मानसिक तयारी करत आहे”.

Story img Loader