भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू आणि फुलराणी अशा नावाने परिचीत असणारी सायना नेहवाल आज विवाहबंधनात अडकली आहे. आपला साथीदार परुपल्ली कश्यप याच्यासोबत एका छोटेखानी कार्यक्रमात सायनाचा विवाहसोहळा पार पडला. सायनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेली काही वर्ष सायना आणि कश्यप हे रिलेशनशीपमध्ये होते. दोन्ही घरच्यांनी लग्नाला परवानगी दिल्यानंतर, सायनाने आपण कश्यपसोबत लग्न करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आपला मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लवकरच दोन्ही परिवाराकडून रिसेप्शनचं आयोजनही करण्यात आलंय.