विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर गेल्या आठवडय़ाभरापासून भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन स्पर्धेच्या वेळीही मिळायला हवे, यासाठी विमल कुमार इन्चॉनमध्येही हवेत, अशी मागणी सायनाने केली आहे.
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कोरिआला जाणाऱ्या प्रशिक्षकांच्या यादीमध्ये विमल कुमार यांचेही नाव असावे, अशी मागणी सायनाने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाला (बाइ) केली आहे. आम्ही ही सायनाची मागणी अधिकारी वर्गाला पाठवली असून त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहात आहोत,’’ असे ‘बाइ’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘‘आशियाई स्पर्धेला जाणाऱ्या बॅडमिंटन चमूबरोबर पुलेला गोपीचंद, मधुमिता बिश्त आणि विजयदीप सिंग हे तीन प्रशिक्षक पाठविण्यात येणार होते. पण आता विमल कुमार यांचे नाव यादीमध्ये घ्यावे लागेल. पण जर अतिरिक्त प्रशिक्षक गेल्यास त्याचा फायदा भारतीय चमूला नक्कीच होईल,’’ असेही त्यांना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा