गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नसतानाही बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत खेळतात.
‘‘गेल्या वर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मी पराभूत झाले होते. यंदा ही कामगिरी सुधारण्यासाठी मी उत्सुक आहे. डेन्मार्क आणि फ्रान्समधील स्पर्धेनंतर गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी मला पुरेसा वेळच मिळाला नाही. गुडघ्याला पट्टी बांधून खेळणे खेळायचे नसते. असे पद्धतीने खेळणेही अवघड असते. जेवढे शक्य होईल त्या स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे सायनाने सांगितले. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या कमाईनंतर सायनाने डेन्मार्क स्पर्धेचे जेतेपद कमावले होते. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने धडक मारली होती.    

Story img Loader