नव्या वर्षांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेणाऱ्या सायना नेहवालने आपले स्थान टिकवण्यात यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेने ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यानुसार चीनची ली झुरूई अव्वल स्थानी आहे तर लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती सायना ८०४६१.७४४४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू कारकीर्दीतील सर्वोत्तम १६व्या स्थानी आहे. पुरुषांच्या क्रमवारीत पारुपल्ली कश्यपने नववे स्थान कायम राखले आहे.
सायनाने कायम राखले क्रमवारीतील दुसरे स्थान
नव्या वर्षांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेणाऱ्या सायना नेहवालने आपले स्थान टिकवण्यात यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेने ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यानुसार चीनची ली झुरूई अव्वल स्थानी आहे तर लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती सायना ८०४६१.७४४४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू कारकीर्दीतील सर्वोत्तम १६व्या स्थानी आहे.
First published on: 01-02-2013 at 04:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina retains second place in rankings