सायनाने ८००९१.७४ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी चीनची ली झुएरूई असून तिच्या खात्यात ९४६२६.७१ एवढे गुण आहेत.
लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत पोहोचून चमकदार खेळ करणाऱ्या कश्यपने ५१९८६.६९ गुणांसह दहावे स्थान पटकावले आहे. यापूर्वीच्या क्रमवारीत तो ११ व्या स्थानावर होता. पुरुषांच्या क्रमवारीत अव्वल २५ जणांच्या यादीत स्थान मिळवणारा कश्यप पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
युवा महिला खेळाडू पी.व्ही.सिंधूने ४३११६.८६ गुणांसह १६ वे स्थान पटकावले आहे. तर अजय जयराम या क्रमवारीत एका स्थानाने पिछाडीवर पडला असून तो ३७६९२.०० गुणांसह ३१ व्या स्थानावर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा