इंडोनेशिया खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तीन वेळा विजेत्या सायना नेहवालची भारताच्याच पी. व्ही. सिंधूशी गाठ पडणार आहे.
जागतिक क्रमवारीच्या अव्वल स्थानावरील सायनाला स्पध्रेसाठी दुसरे मानांकन दिले आहे. सायनाची पहिल्या फेरीत थायलंडच्या निकाओन जिंदापोनशी लढत होणार आहे. आतापर्यंत सायनाने तिन्ही लढतींत जिंदापोनला पराभूत केले आहे.
सिंधूची पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या सू या चिंगशी गाठ पडणार आहे. सिंधूने २७व्या स्थानावरील असलेल्या चिंगला हरवल्यास तिचा सायनाशी सामना होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा