रेश्मा राईकवार

कुठलाही सिनेमा पाहताना केवळ त्यातली कथा, मांडणी, नावाजलेले कलाकार, त्यांचा अभिनय, संगीत या एवढय़ाच गोष्टी पुरेशा नसतात. त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आपल्यालाही अनुभवता येणारी संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचा एखाद्या व्यक्तीबरोबर वागताना-बोलतानाचा वावर किंवा परिस्थितीनुरूप व्यक्त होण्याची त्यांची शैली या सगळय़ातून त्यांचं एक अस्तित्व प्रेक्षक म्हणून आपल्याशी जोडलं जातं. मिखिल मुसळे दिग्दर्शित ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या चित्रपटाविषयी समजून घेण्याआधी त्यातील संस्कृतीविषयी उल्लेख करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदी चित्रपटात मराठी संस्कृती अनुभवण्याची संधी हा चित्रपट देतो.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ हा रहस्यमय चित्रपट आहे, रहस्यापलीकडे जात वैयक्तिक, सामाजिक मनभेदांवरही तो थेट बोलतो. पण त्यातली पात्रं मराठी आहेत, एका मराठी शिक्षिकेची महाराष्ट्रात घडलेली कथा यात आहे. मग हिंदीत हा चित्रपट रंगवताना केवळ मराठी संवाद मधल्यामध्ये कलाकारांच्या तोंडी देत तो महाराष्ट्रीय पात्रांचा चित्रपट आहे हे दाखवण्याचा फुकाचा प्रयत्न यात नाही. तर खरोखर मराठी संस्कृतीचं प्रतििबब त्यात उमटावं यासाठी कथेची मांडणी, संवाद, कलाकारांची निवड, पार्श्वसंगीत या सगळय़ाचा काटेकोर विचार यात झाला आहे. चित्रपट पाहताना ते जाणवतंच आणि या चित्रपटाच्या लेखकांच्या चौकडीपैकी एक असलेल्या प्रसिद्ध पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन यांनी समाजमाध्यमांवर नुकत्याच केलेल्या ‘महाराष्ट्रात घडणारा हिंदी चित्रपट बनवायचा आहे ही दिग्दर्शक मिखिल मुसळे यांची इच्छा होती’ या पोस्टीने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. एक हत्या की आत्महत्या की नुसतंच एखादी व्यक्ती हरवल्याचा बागुलबुवा उभा करत लबाडीचा, लुटालुटीचा प्रयत्न.. या संशयाचं कोडं पोलिसांना गुंतवून ठेवेल असं प्रकरण इन्स्पेक्टर बेला बरोट (निम्रत कौर) यांच्याकडे येतं. बेला यांना सहकारी म्हणून इन्स्पेक्टर राम पवार (चिन्मय मांडलेकर) यांची नियुक्ती केली जाते. सजनी शिंदे नामक पुण्यातील एका शिक्षिकेचा शाळेच्या कामानिमित्ताने सिंगापूर दौऱ्यावर असताना तेथील बारमध्ये मद्यधुंद नाचतानाच्या अवस्थेतील व्हिडीओ चुकून व्हायरल होतो. एका रात्रीत सजनीचं विश्व बदलतं. घरी परतलेल्या सजनीला घरातील लोक, शाळेतील सहकारी अगदी तिचा होणारा पती कोणीही समजून घ्यायला तयार होत नाहीत. या मानसिक कोंडीने अस्वस्थ झालेली सजनी अचानक एके दिवशी गायब होते. तिचं काय झालं? तिची हत्या झाली की तिने आत्महत्या केली की तिला पळून जायला कोणी मदत केली.. आणि अगदीच काही नाही तर सजनी स्वत:च हे सगळं करते आहे का? अशा कित्येक प्रश्नांच्या चौकटीतून बेला आणि राम या प्रकरणाचा माग घेण्यास सुरुवात करतात.

हेही वाचा >>> धक्कादायक! ३१ वर्षीय मॉडेलचा फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूआधी केला भयावह प्रकार

हत्या किंवा आत्महत्या आणि त्याअनुषंगाने सुरू होणारा पोलीस तपास, एकेक साखळी उलगडत नेत अखेर प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्याची प्रक्रिया हा चित्रपटातील कथेचा मुख्य भाग किंवा कथा पुढे नेणारा भाग इथे आहे. अशा पद्धतीच्या रहस्यात प्रेक्षकांना गुंतवण्यासाठी कथा आणि दिग्दर्शकीय मांडणी दोन्ही चोख हवं. इथे दिग्दर्शक मिखिल मुसळे यांच्यासह पिरदा जोशी, अनु सिंह चौधरी आणि क्षितिज पटवर्धन या चौघांनी पटकथा लेखनात हे आव्हान उत्तम पेललं आहे. लेखक आणि दिग्दर्शक यांच्यात एकसूत्रता हवी जी इथे ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’मध्ये जाणवते. सजनीच्या गायब होण्यामागचं कोडं उलगडणं हा निव्वळ यातला उद्देश नाही. सतत संस्कृतीचे गोडवे गाणारा समाज कुठल्याही पद्धतीने तथाकथित नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन वागलेल्या व्यक्तीचा जराही विचार करत नाही, विशेषत: ती स्त्री असेल तर तिच्या चारित्र्याचे िधडवडे काढले जातात. तिला बाहेरख्याली, चारित्र्यहीन ठरवून तिची जगण्याची आशाच संपवली जाते. एक पिढी बुरसटलेल्या विचारांना धरून बसलेली आहे म्हणावं तर आजची स्वत:ला आधुनिक म्हणवणारी पिढी दुटप्पी वा सोयीने वागणारी आहे. आपल्या पत्नीने घर, घरातल्या चालीरीती, सणवार सगळं निगुतीने पारंपरिक पद्धतीने सांभाळावं हा हट्ट असणाऱ्या कित्येक पुरुषांना बिछान्यात पत्नी आधुनिक पद्धतीने त्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करणारी हवी, मित्रांमध्ये – पार्टीमध्ये वावरताना मॉडर्न, कमी कपडय़ांतही टेचात वावरणारी हवी. चित्रपटात सजनीच्या प्रियकराच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘इतकंही मॉडर्न व्हायला सांगितलं नव्हतं..’. या अशा बारीकसारीक तपशिलांवर बोट ठेवत लेखक – दिग्दर्शक यांनी समाजाचा दांभिकपणा, विचारांमधील गोंधळलेपण, जगण्यातला विरोधाभास दाखवून दिला आहे. स्त्रीवादाचा पुरस्कार करतानाही केवळ नारेबाजी करून पुरेसं नाही. तिथेही पीडितेला उभं करण्यापेक्षा समाजमाध्यमांचा आधार घेत आवाजी प्रसिद्धी वा राजकारणाचा रंग चढवण्यातच कार्यकर्ते मग्न होतात.  घरचा प्रसंग असो वा आपल्या आजूबाजूला घडणारा प्रसंग काहीएक ठोस भूमिका घेऊन खंबीरपणे त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्नच होताना दिसत नाही. विशेषत: अडचणीत सापडलेल्यांचा माणूस म्हणून विचार होणं गरजेचं आहे, तसं न होता त्याला दोषी ठरवून त्याचं अस्तित्वच संपेल इतकं विखारीपण दाखवताना मात्र समाज एकत्र दिसतो. सजनीची गोष्ट या अनेक बाजूंचा विचार करता खूप महत्त्वाची ठरते.

कथेला अनुरूप कलाकारांची निवड केल्याने अभिनयाच्या बाबतीतही चित्रपट कुठेच कमी पडत नाही. चिन्मय मांडलेकरचा राम पवार त्याच्या आजवरच्या भूमिकेपेक्षा खूप मस्त आहे. निम्रत कौरची डॉबरमॅन मॅडम एकदम झक्कास. एरव्ही साधीसरळ, सोशिक वाटणारी निम्रत इन्स्पेक्टर बेलाच्या रोखठोक भूमिकेत भाव खाऊन गेली आहे. असंच काहीसं अभिनेत्री भाग्यश्रीच्या बाबतीत म्हणता येईल. तिला आजवर अशा भूमिकेत कोणी पाहिलेलं नाही.  सुबोध भावे, आशुतोष गायकवाड दोघांच्याही व्यक्तिरेखांना अधिक वाव मिळायला हवा होता. सजनीच्या भूमिकेत राधिका मदनने पकडलेला हेल, देहबोली तिच्या व्यक्तिरेखेला अधिक गहिरं करते. अभिनेता सोहम मजूमदारही सिध्दांतच्या भूमिकेत लक्ष वेधून घेतो. जमेच्या बाजू अधिक असलेल्या या चित्रपटात काही कच्चे दुवेही आहेत, मात्र त्यामुळे रंजनात आणि आपला विचार पोहोचवण्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही.

सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ

दिग्दर्शक – मिखिल मुसळे

कलाकार – निम्रत कौर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, राधिका मदन, आशुतोष गायकवाड, सोहम मजूमदार, भाग्यश्री पटवर्धन, सुमित व्यास.