भारताचा डेव्हिसपटू साकेत मायनेनी याच्यावर लेक्झिंग्टन चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आली. त्याला इंग्लंडच्या लिआम ब्रॉडी याच्याकडून २-६, १-६ असे पराभूत व्हावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायनेनी व रामकुमार रामनाथन यांनी दुहेरीत वेगवेगळय़ा जोडीदारांसह उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मायनेनी याने बल्गेरियाच्या दिमितार कुत्रोवस्की याच्या साथीत अग्रमानांकित अ‍ॅलेक्स बोल्ट व अँड्रय़ू व्हिटिंग्टन या ऑस्ट्रेलियन जोडीवर ७-५, ५-७, १०-७ असा सनसनाटी विजय मिळविला. रामकुमारने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमेनच्या साथीने सॅम बार्नेट व जेसी व्हिटन यांचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला.

TOPICSमॅच
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saket maineni loose the match