भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक ही खेळाव्यतिरिक्त फार कमी वेळा चर्चेत असते. तिच्या खेळातील कामगिरीने ती नेहमी स्वतःला सिद्ध करत असते आणि भारताचे नाव जगात उंच करत असते. तिचा भारताकडून यथोचित सन्मानदेखील वेळोवेळी केला जातो. मात्र यावेळी तिचा एक आगळावेगळा सन्मान झाला आहे.
एखाद्या महापुरुषाचा किंवा महान व्यक्तीचा सन्मान हा पोस्टाच्या तिकिटावर त्या महापुरुषाचा किंवा महान व्यक्तीचा फोटो चिकटवून करण्यात येतो. अशा प्रकारचा सन्मान मिळणे ही मोठी गोष्ट असते. अशाच काहीशा प्रकारचा सन्मान साक्षीला मिळाला आहे. तिने स्वतः या संदर्भातील फोटो ट्विट करून याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
साक्षीने एक फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केला आहे. एका स्पर्धेत विजेत्याला देण्यात येणाऱ्या पदकावर साक्षीचा लढतीतील फोटो वापरण्यात आला असल्याचा तो फोटो आहे. साक्षीने स्वतः हा फोटो ट्विट केला असून हा आपला सन्मानच असल्याचे म्हटले आहे. ‘पूर्वी मी पदक मिळवण्यासाठी खूप परिश्रम घेत होते. पण आता थेट पदकावरच माझा फोटो वापरण्यात आला आहे. हा माझा सन्मानच आहे. मला दिलेल्या या सन्मानासाठी आणि प्रेमासाठी खूप खूप आभार’, असे तिने लिहिले आहे.
Phele mai medal ke liye tarastii thi.. and now on the medal my picture – what an honour. Thank you for the love and the respect – from my very full heart. pic.twitter.com/ELn8l5gihz
— Sakshi Malik (@SakshiMalik) November 5, 2018