Sanjay Singh being elected as president of WFI : भारताची अनुभवी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक गुरुवारी (२१ डिसेंबर) पार पडली. संजय सिंह नवे अध्यक्ष झाले आहेत. ते माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. या वर्षी पहलवानांनी ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात मोर्चा काढला होता आणि दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्तीपटू साक्षी मलिकने दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून बरेच लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. जर ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड होते, तर मी कुस्ती सोडते. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे आभार. आम्ही पूर्ण ताकदीने लढलो. अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासारखा माणूस राहतो तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते.”

क्रीडा मंत्रालयाने दिलेले आश्वासन…

बजरंग पुनिया म्हणाला, “क्रीडा मंत्रालयाने आश्वासन दिले होते की डब्लूएफआय बाहेरून कोणीतरी फेडरेशनमध्ये येईल. संपूर्ण व्यवस्थेने ज्या पद्धतीने काम केले त्यामुळे मुलींना न्याय मिळेल असे वाटत नाही. आपल्या देशात न्याय उरलेला नाही, तो फक्त कोर्टातच मिळेल, ज्यासाठी आपण लढलो त्यासाठी येणाऱ्या पिढ्यांना आणखी लढावे लागेल. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.”

हेही वाचा – IPL Auction : रांचीचा ख्रिस गेल, रॉबिनला मिळाले ३.६ कोटी; धोनी म्हणाला होता, “कुणी घेतलं नाही तर मी घेईन…”

संजय सिंग यांनी अनिता यांचा पराभव केला –

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अनिता शेओरानचा पराभव करून संजय सिंह अध्यक्ष बनले. बुधवारपर्यंत बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न सुरू होते, मात्र यश आले नाही. निवडणुकीत प्रत्येक पद जिंकणार असल्याचा दावा संजय सिंग यांनी केला होता आणि तो त्यांनीच जिंकून खरा करून दाखवला.

हेही वाचा – BBL 2023 : आरसीबीने खरेदी केलेल्या अष्टपैलू खेळाडूवर चार सामन्यांची बंदी, काय आहे कारण? जाणून घ्या

कोण आहे संजय सिंग?

संजय सिंह यूपी रेसलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राहिले आहेत आणि ते ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय मानले जातात. निवडणुकीपूर्वीच्या अनेक बातम्यांमध्ये संजय सिंह यांच्या गटाला ५० पैकी ४१ मतांचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. आसाम, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि ओडिशा वगळता जवळपास सर्व राज्यांच्या कुस्ती संघटनांचा त्याला पाठिंबा मिळेल, असे सांगण्यात आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakshi malik has announced quitting wrestling following sanjay singh being elected as president of wfi vbm
Show comments