Salil Ankola Former India Cricketer Mother Death: माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाला मातृशोक झाला आहे. अंकोला यांच्या आईचा मृतदेह त्यांच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आईच्या मानेवर जखमेच्या खुणा आहेत. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलीस वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचे मत घेत आहेत.

माजी क्रिकेटर सलील अंकोलाची आई माला अंकोला या ७७ वर्षांच्या होत्या. या घरातील संपूर्ण प्रकरणानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांचा खून झाला की नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
stray dogs attack on small boy
कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू

हेही वाचा – IND W vs NZ W Live Score: भारत-न्यूझीलंड सामन्याला सुरूवात, किवी संघाची चौकाराने सुरूवात

सलील अंकोला यांच्या आईचा मृतदेह घरात सापडल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सलील अंकोला यांनीही आपल्या आईच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

हेही वाचा – Rashid Khan: राशिद खानबरोबर एकाच मांडवात तीन भावांचं लग्न, अफगाणिस्तानला दिलेलं वचन विसरल्याने चाहते नाराज; काय आहे कारण?

सलील अंकोलाच्या पहिल्या पत्नीने केली होती आत्महत्या

डिसेंबर २०१३ मध्ये माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाची पहिली पत्नी परिणीती (४६) हिने आत्महत्या केली होती. पुण्यातील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सलील अंकोलापासून विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांपासून ती तिथे राहत होती. त्यांच्याकडून पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने जीवनाला कंटाळल्याचे लिहिले होते.

हेही वाचा – Womens T20 WC 2024 : श्रीलंका-पाक सामन्यात रुमाल पडल्याने फलंदाजाला मिळाले जीवदान, नेमकं कारण काय? जाणून घ्या

सलील अंकोलाची क्रिकेट कारकीर्द

सलील अंकोलाने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच सामन्यातून सचिन तेंडुलकरनेही पदार्पण केले होते. सलीलने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या डावात एक विकेट घेतली होती, तर दुसऱ्या डावातही त्याला एकच विकेट मिळाली होती. त्याच वर्षी त्याला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सलील अंकोला १९९६ च्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता.

त्याने भारतासाठी फक्त एक कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज होता. आपल्या कारकिर्दीत खेळल्या गेलेल्या एका कसोटी सामन्यात फक्त दोन विकेट घेतल्या आणि २० एकदिवसीय सामन्यात फक्त १३ विकेट घेतल्या. या आकड्यांच्या आधारे बोलायचे झाले तर त्याची क्रिकेट कारकीर्द काही खास नव्हती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलीलने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ५४ प्रथम श्रेणी सामन्यात १८१ विकेट घेतल्या.१९९७ मध्ये त्याने भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

Story img Loader