Jasprit Bumrah Sam Konstas Fight in Sydney test: भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारताचा गोलंदाज बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला होता. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस दोघे एकमेकांशी भिडले आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. आता १९ वर्षांच्या कॉन्स्टासने याबाबत आपली चूक मान्य केली आहे.
सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने भारताला सर्वबाद केलं आणि कांगारू संघाचे फलंदाज फलंदाजीसाठी उतरले. यानंतर भारताने झटपट खेळ सुरू केला आणि शक्य तितक्या षटकांचा खेळ झाला पाहिजे हा भारताचा प्रयत्न होता. तर नॉन स्ट्राईकर एंडवर उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजा वेळ काढू पाहत होता. बुमराहने यावर पंचांना प्रश्न केला. त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या कॉन्स्टासने बुमराहशी मुद्दाम वाद घालण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर बुमराहनेही त्याला प्रत्युत्तर दिले. या वादावादीमध्ये दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाने आपली विकेट गमावली होती.
हेही वाचा – VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अॅक्शन कॉपी करण्याचा मोह
बुमराह आणि कॉन्स्टास यांच्यात झालेल्या या वादावर अनेकांना विविध प्रतिक्रिया दिल्या. १९ वर्षीय खेळाडूला भारतीय संघाने धमकावल्याचेही अनेक जण म्हणाले. पण आता ऑस्ट्रेलियाच्या या १९ वर्षीय खेळाडूनेच त्याची चूक असल्याचे मालिकेनंतर मान्य केले आहे.
हेही वाचा – VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
या विजयाच्या काही दिवसांनंतर आता कॉन्स्टासने बुमराहसोबतच्या लढतीवर आपले मत व्यक्त केले असून आपल्याकडून चूक झाल्याचे म्हटले आहे. मैदानावर झालेल्या वादांमुळे मैदानावरील स्पर्धा वाढते का, यावर उत्तर देताना तो म्हणाला, “या गोष्टीचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. दुर्दैवाने उस्मान ख्वाजा बाद झाला. तो तिथे वेळ काढण्याचा प्रयत्न करत होता. पण ही माझी चूक होती. मी बुमराहला उकसवल्यामुळे तो बाद झाला, पण अशा घटना घडतात. हे क्रिकेट आहे. पण या विकेटचं श्रेय बुमराहला जातं. त्याने विकेट मिळवली, पण एकंदरीतच आमच्या संघाने चांगली कामगिरी केली,” असं कॉन्टसने ट्रिपल एमला सांगितले.
बुमराहविरुद्ध कॉन्स्टासने या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने बुमराहविरुद्ध जबदरस्त कामगिरी करत मोठमोठे फटके खेळले. बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने षटकार लगावण्याचे धैर्य दाखवत मोठे फटके खेळले पण त्यानंतर बुमराहने त्याला मोठी खेळी करण्याची संधी दिली.