IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas record list : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. जिथे ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासने शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यातून त्याने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अनेक विक्रम केले. या खेळीदरम्यान सॅम कॉन्स्टासने भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला लक्ष्य करताना आक्रमक फलंदाजी केली. दरम्यान, त्याने अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
सॅम कॉन्स्टासने केली बुमराहविरुद्ध फटकेबाजी –
जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टासने चमकदार कामगिरी केली. बुमराहविरुद्ध धावा करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते, पण या १९ वर्षीय खेळाडूने बुमराहविरुद्ध धावा सहज केल्या. या सामन्यात त्याने दोन षटकार मारले. त्याने हे दोन्ही षटकार जसप्रीत बुमराहविरुद्ध मारले आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बुमराहला दोन षटकार मारणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त जोस बटलरने अशी कामगिरी केली होती.
जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटीत एका डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
४५(६८) – जो रूट, लॉर्ड्स, २०२१
३९(६३)- ॲलिस्टर कुक, द ओव्हल, २०१८
३८(४६)- स्टीव्ह स्मिथ, सिडनी, २०२१
३४(३३) – सॅम कॉन्स्टास, मेलबर्न, २०२४
याशिवाय त्याने बुमराहविरुद्ध एकूण ६ चौकार मारले. कसोटी क्रिकेटच्या एका डावात बुमराहविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. तर सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटीत एका डावात चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा केल्या. बुमराहविरुद्धच्या या सामन्यात त्याने ३३ चेंडूत ३४ धावा केल्या.
जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटीत सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज –
७ – ख्रिस वोक्स, द ओव्हल, २०२१
६ – सॅम कोन्स्टास, मेलबर्न, २०२४
६ – फाफ डु प्लेसिस, केप टाउन, २०१८
हेही वाचा – IND vs AUS : जसप्रीत बुमराहविरुद्ध ४,४८३ चेंडूंनंतर मारला षटकार, ‘या’ खेळाडूने केला हा खास पराक्रम
ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडू –
१७ वर्षे ४० दिवस इयान क्रेग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न १९५३
१९ वर्षे ८५ दिवस सॅम कॉन्स्टास विरुद्ध भारत, मेलबर्न २०२४
१९ वर्षे १२१ दिवस नील हार्वे विरुद्ध भारदत मेलबर्न १९४८
१९ वर्षे १५० दिवस आर्ची जॅक्सन विरुद्ध इंग्लंड, ॲडलेड १९२९